DONKEY 
देश

EVM वाहतुकीसाठी गाढवांची मदत

सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई- सध्या चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये विधासभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. तमिळनाडूमध्ये ईव्हीएम वाहून नेण्यासाठी गाढवांची मदत घेण्यात आली होती. तमिळनाडूतील ईरोड आणि धर्मापुरी जिल्ह्यांत विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ईव्हीएम वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करण्यात आला. अंथीयूर मतदारसंघातील कथीरीमलाई खेड्यात रस्ते खराब असल्यामुळे वाहने जाणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने गाढवांची मदत घेतली. धर्मापुरी जिल्ह्यातही डोंगराळ भागांतील मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि अन्य सामग्री नेण्यासाठी गाढवे उपयुक्त ठरली. धर्मापुरीमध्ये पाच मतदारसंघ आहेत. गाढवांच्या मदतीने तयारी केली जात असताना पोलिस बंदोबस्त कायम होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Annual General Meeting 2026 Date : 'गोकुळ'ची सर्वसाधारण सभाही गाजणार; न झालेली सभा 30 नोव्हेंबरपूर्वी घ्यावी लागणार, 25 रोजी न्यायालयात सुनावणी

NVIDIA CEO: जगातील सर्वात मोठ्या चिप कंपनीच्या CEO पदासाठी 3 भारतीयांची नावं चर्चेत! कोण मारणार बाजी?

Latest Marathi News Live Update: बुलढाणा- जळगावला भूकंपाचे हादरे

धक्कादायक! उत्तर प्रदेशात १ कोटी २७ लाख हिंदू मतदार झाले कमी; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले मोठे कारण

Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT